भाग १ मधील त्या 'so called' घडामोडींचा रेल्वे प्रवास करून आमच्या गावी येऊन पोहचलो. घरी १ दिवसाचा मुक्काम करून आम्ही आमच्या 'दिवाळसणाच्या' पुढील प्रवासासाठी, एका साधारण ७००-८०० लोंकांची वस्ती असलेल्या छोट्या खेड्या कडे निघालो.
तत्पूर्वी.... माझ्या सासुरवाडी कडील समस्त परिवार 'दिवाळी' सण, दरवर्षी त्यांच्या गावी साजरा करतात. ते गाव माझ्या 'माहेरून' साधारण १०० किलोमीटर असावे. त्यामुळे आमचा 'पहिला दिवाळसण' हा त्याच गावात होणार होता.
घरची गाडी आम्ही पुण्यालाच ठेऊन आलो असल्यामुळे, वातानुकुलीन डब्ब्या मध्ये आलेले जावईबापू, मुलीला घेऊन 'महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या' चक्क लाल डब्ब्या मध्ये निघणार होते. प्रवासाच्या गंमती जंमती जणू पाठ सोडतच नव्हत्या. बस स्थानकावर गेलेल्या आम्हाला सणा सुदीच्या अति गर्दी मुळे, जवळ जवळ २-३ बस सोडाव्या लागल्या. शेवटी 'ब्रेक जर्नी' करायचे ठरले.
साधारण ५५ किलोमीटर प्रवास करून आम्ही एका तालुक्याच्या ठिकाणी येऊन पोहचलो. नेहमी 'मुंबई-पुणे' प्रवास करताना लोणावळ्याच्या 'फूड मौल' ला थांबायची सवय मला होती. पण इथे चित्र थोडे वेगळे होते. फक्त १५-२० लोक पांढरा पायजमा आणि पांढराच कुर्ता घालून, गळ्यात एक लाल रंगाचा पट्ट्या पट्ट्याचा शेला घालून सकाळचा चहा घेत उभे होते. त्याच्या पोशाखावरून ते शेतकरी असावे असा मी समज बांधला.आम्हा दोघांसाठी काही खाण्याकरिता म्हणून 'स्यान्डवीच आणि शीतपेय' आणण्यासाठी गेलेलो मी, फक्त एक पार्ले बिस्कीट चा पुडा आणि १ रुपया किमत असलेला पोप्कॉर्न चा पुडा घेऊन आलो. कारण तिथे त्या व्यतिरिक्त काहीही मिळत नव्हते. पुढील प्रवासाची मला अजून देखील कल्पना आलेली नव्हती.
पुन्हा १५ ते २० मिनिटे वाट बघून आम्ही दुसऱ्या बस मध्ये बसलो. तेव्हाच मला 'हिने' सांगितले कि कोणतीच बस त्या गावा पर्यंत जात नाही, आपल्याला हि बस ३५ किलोमीटर अंतर पार करून एका 'फाट्याला' सोडावी लागेल आणि मग तिथून अखेरचा १०-१२ किलोमेतर चा प्रवास करावा लागेल. अचानक मला मी 'मोहन भार्गव' आणि हि 'गीता भार्गव' (स्वदेश) असल्याचा भास होत होता. आणि आम्ही 'गीताच्या' शेतावर चाललो आहे. मग उगाचच बस मध्ये 'शाहरुख' च्या बाजूला बसलेले तेच लोक मला माझ्या बाजूला बसले आहेत, असे वाटू लागले. फरक फक्त 'caraman' चाच होता. असो.
प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर येऊन आम्ही पोहचलो होतो. आता फक्त शेवटचे १२ किलोमीटर अंतर पार करायचे होते. तो प्रवास 'बैलगाडीची' लिफ्ट घेऊन मी पूर्ण पार केला. एक छोटे खेडे पार करून आम्ही आमच्या इच्छित खेड्या वर येऊन पोहचलो. 'ठाकूर साब का घर कहा है?' असे विचारत विचारत आम्ही जय्यत तयारी केलेल्या माझ्या 'सासुरवाडीला' एकदाचा येऊन पोहचलो होतो.
यथेच्छ स्वागत झाल्यावर, मला सासरच्या लोंकानी 'प्रवास कसा झाला?' आणि प्रवासा संबंधी काही इतर प्रश्न केल्यावर मी फक्त 'छान छान' म्हणूनच चेहेऱ्यावर एक स्मित हास्य कसेबसे आणले. (आता हा ब्लॉग वाचायला द्यावा असा एक विचार सारखा मनात येतो आहे.)

गावाकडील हे घर १४ खोल्यांचे जुन्या बांधणीचे होते, पहिले व्हरांडा, मग एक मोठा दिवाणखाना, धान्य साठ्याच्या काही खोल्या, एक भले मोठे स्वयंपाक घर, देवघर, घरामागे एक दिमाखदार आंगण, तिथे काही घरीच लावलेल्या वेली आणि पेरू, आंबा, लिंबू अशी काही झाडे, कोपऱ्यात एक विहीर देखील होती. अर्धा किलोमीटर अंतरावर एक खळ खळ आवाज करत वाहणारी नदी होती. वाड्या समोर बैलजोड्या बांधून ठेवल्या होत्या. आणि वाड्यामध्ये ९ महिने ते ९० वर्ष या वयोगटातील ४०-५० लोक जमलेले होते. जवळ जवळ तीन ते चार पिढ्या होत्या त्या. म्हणजे माझे सासरे, त्यांचे ८ भाऊ २ बहिणी आणि त्यांचा परिवार. प्रत्येकाला साधारण १ ते २ मुले ज्यांची लग्न होऊन त्यांना नुकतीच मुले झालेली. ज्या मुलींची लग्न झाली आहेत त्या दिवाळसण साजरा करायला आल्या म्हणजे आम्ही. तिथे आमच्या सारखे नुकतेच लग्न झालेले ३ जोडपे आलेले. आणि सासऱ्यांचे वडील म्हणजे सासरे आजोबा आणि आजी, त्यांचा १ भाऊ आणि थोडी फार तशीच आणखी काही नातेवाईक मंडळी. त्यामुळे वाडा अगदी गजबजून गेला होता. ऐरवी अशी गर्दी फक्त लग्न कार्यातच बघायला मिळते. पण इथे हे गेली ३०-४० वर्षांपासून असेच सुरु होते. त्यामुळे सुचत नसले तरी हा माझ्यासाठी एक छान अनुभव होता.
सकाळी विविध प्रकारचा फराळ, चुलीवरचा गरम चहा, नंतर नदीवर जाऊन आंघोळ, तिथे 'भाकरी आणि भाजी' अशी सोबत दिलेली शिदोरी आणि खुल्या मैदानावर दिलखुलास क्रिकेट, त्या नंतर दुपारची वामकुक्षी, संध्याकाळी परत फराळ, दिवाळीची पूजा, फटाके फोडणे, फोटो काढणे. रात्री प्रत्येकाच्या सुप्त गुणांना वाव देणारी एक मैफिल. मैफिलीत गाणे, उखाणे, भजन, तबला, पेटी, लहान मुलांचा अभिनय, कोपरखळ्या, काहींच्या अगदी कवायती देखील, असा एकंदरीत दिवसाचा समारोप नंतर अफाट काळ्या आभाळातील पांढऱ्या चंद्रा कडे बघत शांत झोपेत होत होता. हि दिवसाची रूपरेषा ३ दिवस अगदी मी तशीच ठेवली होती.
अखेरच्या दिवशी, एक छान शेतातील डब्बा पार्टी आयोजित केली होती. आम्ही बरेच जण, सकाळीच नदी वर आंघोळ करून शेतात जमलो होतो. नंतर शेतातच सर्व सामानाची जमवा जमव करून तिथेच पाककला सुरु झाली होती. एक विशेष अशी 'पतोडीची भाजी' करायचा बेत ठरला होता. मी कधीही न खाल्लेली अशी ती भाजी अत्यंत झणझणीत आणि मसालेदार होती. आणि विशेष म्हणजे शेतात असा आस्वाद घेताना तिची मजाच काही वेगळी होती. ह्या व्यतिरिक्त पोळी, भाकरी, भरीत, पिठले, कांदा भाजी, दही, कोशिंबीर, बासुंदी, विविध प्रकारचे पापड, सलाद म्हणून ताजे स्वतः तोडून आणलेले कांदे, मुळे अश्या पदार्थांची मेजवानीचा आस्वाद घेऊन, आम्ही शेतातच थोडा वेळ आंब्याच्या गर्द वनराई मध्ये आरामात पहुडलो होतो.
| क्षणचित्र - १ |

| क्षणचित्र - २ |
अश्या ह्या मेजवानीने कार्यक्रमाची सांगता आणि शेवटचा दिवस अगदी आठवणीतील एक कप्पा होऊन बसला.
मग संध्याकाळी वाड्यावर परत आलो तो फक्त गरम वरण भात खाऊन चंद्राकडे बघत निद्रिस्थ होण्या करिता.
सुट्ट्यांचा नाईलाज असल्यामुळे सकाळीच आम्ही सर्व आप्तेष्ठांचा आशीर्वाद घेत माझ्या 'माहेरी' परत आलो ते 'पहिल्या दिवाळसणाच्या' आठवणी परत घेऊनच.
घरची भाऊबीज करून मग आम्ही निश्चित असलेले आमचे परतीचे 'आझाद हिंद रेल्वे' चे तिकीट रद्द केले आणि स्लीपर बस ने दुसया दिवशी सकाळी पुणे घाठले ते माझे आणि हिचे ऑफिस घाठ्ण्या करिताच.
प्रवासाच्या प्रसंगाने आठवणीत राहिलेला मग 'हा दिवाळसण' माझ्यासाठी कित्तेक प्रकारच्या आणि भावनांनी आठवणीत राहिला.
(समाप्त)
Mastach Masta... Agadi Gaavachi aathavan ali....
ReplyDeleteAsa watata ki Malamachya gavala jaun 1 month rahun yaava...
:)
Lay Bhaari....
Umesh Satavase (Sungard)
Nice blog, Waiting for a blog on South African Diwali @ 8 Beverly.. ;)
ReplyDeletePrasad,
ReplyDeleteIt is too good.
You improved lot and I am very happy that you worked on my suggestions I gave last times.
It's perfect. Keep it up.
I like all the pictures those are too good.
lookforward to next one and all the best.
Atul Deshpande
Zakaas! :)... Zara lavkar liheet jaa. Will help to keep people engaged in your work.
ReplyDeleteThank you very very much Umesh.
ReplyDeleteDelighted to hear that you remembered the 'Mamache gao' from the post.
PRASAD
'अफ्रिकन दिवाळी' किवा 'अफ्रिकेत साजरी केलेली दिवाळी' अश्या विषयाच्या व्यासंगाने लिहिण्याचा विचार करतो आहे.
ReplyDeleteबाकी धन्यवाद निलेश भाऊ.
अतुल देशपांडे: तुमची सूचना नक्कीच पोस्ट ला आणखी चांगली बनवते. त्या बद्दल मनः पूर्वक आभार.
ReplyDeleteAll pictures in the post are actual one's.
And thanks once again.
- PRASAD
Samya: काही तांत्रिक आणि मांत्रिक अश्या अडचणी आल्या होत्या मागील काही दिवसात, म्हणून लिखाण करता आले नाही.
ReplyDeleteपण पुढील कार्यात ह्या गोष्टीची नक्कीच काळजी घेईल.
And Thanks for your precious suggestions..
खूपच छान प्रसाद.
ReplyDeleteअसेच लिहीत रहा.
पुढील लेखनास शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद राहुल.
ReplyDeleteWill keep on posting.
:)