| सोन्याची पाने |
'दसरा' या सणा ऐवजी मी, या दिवशी माझ्या मनाला स्पर्शुन गेलेला एक विचार, एक मनोगत कथित करणार आहे..
तेव्हा मी नववीत होतो. आणि तो 'दसऱ्या' चा दिवस होता. बाबांच्या मते मी मोठा झालो होतो. आणि म्हणूनच त्यांनी मला त्या दिवशी 'सोन - म्हणजेच आपट्याची पाने' आणायला पाठवले होते. सध्याकाळचे ५-५:३० वाजले असतील. मी नवीन घेतलेला सोनेरी कोश्याचा गुरूशर्ट आणि पांढरा शुभ्र असा पायजामा घातला होता. आणि आता माझ्या 'टॉप गियर' सायकल वरुन ऐटीत निघालो होतो.
'दसरा' दिवस म्हणून पहिले 'श्रीराम' मंदिरात गेलो (तसा मी एकनिष्ठ 'रामभक्तच'). मनोभावे नमस्कार करून मी त्या दिवशी 'दान पेटीत' ५ रुपयांचे नाणे टाकले - हे मला अजूनही स्पष्टच आठवत आहे. आणि आपल्याला नेमुन दिलेल्या 'सोने' आणायच्या' कामाला निघालो.
बाजारात आल्यावर 'सोने' विकणारे ('सोन्याच्या पानांचा' या पुढे मी 'सोने' म्हणूनच उल्लेख करणार आहे) बरेच शेतकरी आणि दुकानदार माझ्या दृष्टीस पडले. त्या दिवशी बाजार झेंडूच्या 'पिवळ्या', 'लाल' आणि आपट्याच्या, आंब्याच्या पानांच्या 'हिरव्या' गर्द रंगांनी खरच भहरून आला होता. मग गिह्राईकांच्या प्रचंड गर्दिनि घेरलेले एक दोन दुकानदार आणि त्यांची 'भांडणात रुपांतर झालेली घासाघिस' सोडून, मी त्यातल्या त्यात ताजी सोन्याची पाने विकणार्या एका 'व्रुद्ध' म्हणून 'आजीबाई' समोर येऊन थांबलो. आणि मग माझा - 'आयुष्यातील व्यवहार सुरू झालेला होता....'